बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्थापना दिनीच काँग्रेसचा झेंडा पडला खाली, ‘तो’ व्हिडीओ आला समोर

नवी दिल्ली | काँग्रेसचा आज 137 वा (Congress 137th Foundation day) स्थापना दिन आहे. त्यामुळे वर्धापन दिनानिमित्त आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हातून (Sonia Gandhi) दिल्ली येथे झेंडा फडकविण्याचा कार्यक्रम होता. मात्र, झेंडा फडकवितानाच एक अतिशय वाईट घटना घडली आहे. ज्यामुळे कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे.

व्यासपीठावर सोनिया गांधी झेंडा फडकविण्यासाठी पुढे आल्या. त्यांनी झेंडा फडकविण्यासाठी दोरी ओढली. पक्षाचा झेंडा वर गेला. मात्र तो झेंडा फडकण्याऐवजी सोनिया यांच्या हातात खाली पडला. त्यामुळे सगळेचं नेमकं काय घडलं? अशा प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. सोनिया गांधी ह्या सुद्धा काही वेळासाठी अवाक झाल्या होत्या.

झेंडा खाली पडल्याने सर्व उपस्थित कर्मचारी सैरभैर झाले होते. तेव्ह कर्मचाऱ्यांनी पुन्हा झेंडा नीट लावण्याचा प्रयत्न केला. स्वत: सोनिया गांधी यांनी झेंडा लावण्यास मदत केली. पुन्हा एकदा झेंडा फडकवण्यात आला. सोनिया गांधी यांनी अतिशय शांततेत परिस्थिती हातळली. मात्र, वर्धापन दिनीचं अशी घटना घडल्याने सध्या चर्चांना वेग आला आहे.

दरम्यान, सध्या काँग्रेसची परिस्थीती फार काही ठिक चाललेली नाही. देशात अनेक ठिकाणी  काँग्रेसची परिस्थिती बिघडत आहे. अशातच वर्धापन दिनीच काँग्रेसचा झेंडा खाली पडला. त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मात्र, सोनिया गांधी यांनी यावेळी दाखवलेल्या संयमाचेही कौतुक होत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“…तेव्हा कुठे गेला होता राजा सुता तुझा धर्म”; भास्कर जाधव कडाडले

पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ भागात अलर्ट जारी

‘तिसरी लाट आलीच तर ती…’; Omicron बाबत दिलासादायक माहिती समोर

“उद्धव ठाकरे आजारी आहेत तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावं”

एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणार का?, अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More