हृदयद्रावक घटना! वडिलांच्या मृत्यूदिवशी त्याने दिला गणिताचा पेपर

मंगळवेढा | सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. अशातच सोलापूर (Solapur) जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील एक घटना समोर आली आहे. एकीकडे पेपर आणि दुसरीकडे वडिलांचं निधन अशा बिकट प्रसंगात विद्यार्थी सापडला होता. पण कुटुंबीयांनी त्याला बळ दिलं आणि परीक्षेला गेला.

अल्पशा आजाराने वडिलांचं निधन झालेलं असताना मुलाने आपलं दुःख बाजूला सारून आधी पेपर दिला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हुलजंती येथील कल्लाप्पा आवा रूपटक्के यांचं अल्पशा आजाराने काल सकाळी 8 वाजता निधन झालं. रुपटक्के यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून मुलगा तुकाराम हा एम.पी मानसिंगका विद्यालय सोडडी येथे बारावीच्या वर्गात शिकत आहे. त्याचा शुक्रवारी गणिताचा पेपर होता.

वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलाला पेपर देता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी निर्णय घेऊन मुलाने आधी पेपर द्यावा विनंती केली नंतर त्याने मुखाग्नी दिला.

महत्त्वाच्या बातम्या-