बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनाम्याच्या चर्चेवर रावसाहेब दानवे म्हणाले…

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आज मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. जवळपास 43 मंत्री आज नवीन मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या समारंभापूर्वीच अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. आज सकाळपासूनच राजकीय वर्तुळात केंद्रीय मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवे यांना डच्चू दिल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. मात्र, या चर्चा केवळ अफवा असल्याचं म्हणत दानवेंनी या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

मला पक्षातून राजीनाम्यासाठी फोन आलेला नाही. मला राजीनामा देण्यास सांगितलं नाही, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. तसेच दानवे यांनी आपण दिल्लीला पोहोचलो असल्याची माहिती देखील दिली आहे.

रावसाहेब दानवे यांच्याकडे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. दानवे यांचा दोनवेळा केंद्रातील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. दानवे यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीवरुन त्यांच्यावरील राजीनाम्याचं संकट टळल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा, कामगार मंत्री संतोष गंगवार आणि शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल, निशंक यांच्यासह अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, रतनलाल कटारिया, प्रताप सारंगी आणि देवश्री बॅनर्जी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले”

केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनीही दिला मंत्रीपदाचा राजीनामा

“शेतकरी उध्वस्त होत आहेत, जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत घरी जाणार नाही”

आज तब्बल एवढे मंत्री घेणार मंत्रिपदाची शपथ; केंद्रीय मंत्र्यांची संख्या जाणार 81 वर 

“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे, पण जबाबदारीपासून पळ काढायचा आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More