बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वीकेंड लाॅकडाऊनच्या पुर्वसंध्येला महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी धक्कादायक

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे.  महाराष्ट्रात वीकेंड लाॅकडाऊनला सुरूवात झाली आहे, त्याच्याच पुर्वसंध्येला महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा धक्कादायक आहे.

दिवसभरात राज्यात तब्बल 58 हजार 993 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला  मिळालं, आज 301 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना आज हे गंभीर चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यात आज 45 हजार 391 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातुन घरी सोडण्यात आलं आहे.

महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात विकेंड लाॅकडाऊन घोषित केला, पण तरी लोक नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करताना दिसून येत नाहीत, परिणामी महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे.  दिवसभरात पुण्यातुनही काही प्रमाणात धक्कादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 5 हजार 647 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होणार की अशीच रूग्णसंख्या वाढत जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

लस घेतल्यानंतरही पुन्हा होतोय कोरोना?; सीरमच्या अदर पुनावालांनी सांगितलं खरं कारण

पुण्यात वीकेंड लाॅकडाऊनची नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद?

‘लॉकडाऊनच्या निर्णयाला भाजप सकारात्मक प्रतिसाद देईल पण…’; प्रविण दरेकरांचं मोठं वक्तव्य

कोरोना रुग्णाला घेऊन जाताना तो ऊसाचा रस प्यायला थांबला, पाहा धक्कादायक व्हिडीओ

धमाकेदार ऑफर! ‘या’ शहरात मिळतेय कोरोना लस घेणाऱ्यांना मोफत बिअर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More