Top News शेती

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले…

नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच कृषी कायद्यांविषयी भाष्य केलंय. कृषी कायदे शेतकरी हिताचेच असल्याचं गडकरी यांनी सांगितलंय.

नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात मी सेंद्रीय शेती करतो. प्रताप नगरमध्ये तो भाजीपाला विकला जात असून शेतीतल्या उत्पादनांना चांगला भाव मिळतो. त्यासाठी मला बाजार समितीत जाण्याची गरज नाही. त्यामुळे जर कायदा झाला नसता तर हे घडलं असतं का?”

ते पुढे म्हणाले, “या 3 कायद्यांपैकी एकही कायदा हा शेतकऱ्यांच्या विरोधात नाहीये. शिवाय राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी या बिलांचं समर्थन केलंय. मात्र काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत.”

“हा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. मात्र त्यावर चर्चा करायची असल्याची आज सरकार तयार आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या सुधारणा जरूर सांगाव्यात. परंतु शेतकऱ्यांना पुढे ठेवून राजकारण करणं हे गैर असल्याचं,” गडकरी म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

‘नव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच जास्त फायदा’; जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांचं मत

गिनीज बुकमध्ये नाव असलेल्या मुंबईच्या तरूण व्यावसायिकाची आत्महत्या!

“रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही”

शेतकरी आंदोलन सुरुच रहावं अशी काहींची इच्छा- देवेंद्र फडणवीस

“आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या