बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नाचा पहिला वाढदिवस, पत्नीने सांगितलं पार्लरला जायचं अन् त्यानंतर घडला ‘हा’ प्रकार

जयपूर | लग्नाच्या पहिल्या वाढदिवसा दिवशीच पत्नी फरार झाल्याने संपुर्ण परिवारात खळबळ उडाली होती. यादरम्यान महिलेने आपण पार्लर जात असल्याचं सांगून घरातून पळ काढला होता. मात्र त्यानंतर जे झालं ते विचित्र आहे. या संपुर्ण घटनेनंतर सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे. तसेच या घटनेनंतर पतीला अनेक गोष्टी भोगाव्या लागल्या आहेत.

या घटनेतील संबंधित पतीचं नाव अविनाश वर्मा असं आहे. अविनाश यांची पत्नी त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसा दिवशी पार्लरला चालले असल्याचं सांगून घरातून बाहेर निघाली होती. मात्र त्यानंतर ती घरीच परतली नाही. अविनाश यांची पत्नी उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील असून अविनाश राजस्थानच्या अजमेर येथील रहिवासी आहेत.

31 तास पत्नीचा शोध घेतल्यानंतर अविनाश पत्नीच्या माहेरी गेले. त्यावेळी अविनाश यांच्या पत्नीच्या घरातील व्यक्तींनी दरवाजाच उघडला नाही. त्यामुळे अविनाश बराच वेळ पत्नीच्या घराबाहेर बसून राहीला. मात्र अखेर अविनाश यांना पत्नीशिवाय घरी परतावं लागलं. यादरम्यान, अविनाश यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे.

दरम्यान, या तक्रारीमध्ये अविनाश आपल्या पत्नीला हुंड्यासाठी छळत असल्याचं अविनाश यांच्या पत्नीने सांगितलं आहे. अविनाश अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहेत. मात्र पत्नीच्या तक्रारीनंतर त्यांना नोकरीवरुन काढण्यात आलं आहे. एवढंच नाही तर अविनाश यांच्या आई-वडिलांनी देखील त्यांना संपत्तीमधून बेदखल केलं आहे. यानंतर अविनाश आपल्या पत्नीशी अनेक वेळा फोन वर बोलला तरी त्यांच्या पत्नीने घरी येण्यास नकार दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मोहम्मद सिराज हा जसप्रीत बुमराहला सर्वोत्तम पर्याय’; भारतीय संघाच्या ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

एका पत्रकाराला अटक करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी थेट विमानाचं केलं अपहरण, वाचा संपुर्ण प्रकरण

‘राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू’; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

प्रेम केल्याची जीवघेणी शिक्षा, कोल्हापुरात प्रेयसीच्या वडिलांच्या भितीने युवकाची आत्महत्या

PNB घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी 3 दिवसांपासून गायब; पोलिसांचा तपास सुरू

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More