Top News महाराष्ट्र मुंबई

राज्यात पहिल्या दिवशी ‘इतक्या’ कोरोना योद्ध्यांना मिळणार लस!

मुंबई | आज 16 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाला सुरु होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या दिवशी 28,500 कोरोना योद्ध्यांना लस मिळणार असल्याची माहिती समोर येतं आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील लसीकरणाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता मुंबईतील पालिकेच्या वांद्रे- कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे.

महानगरपालिकेला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड19 आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचे सुमारे १ लाख ३९ हजार ५०० डोस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेकडं १ लाख ३० हजार लसींची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे.

तसंच मुंबईत एकूण 9 केंद्रांवर 40 बूथवर लसीकरण होणार असून, सुरूवातीला दररोज सरासरी ४ हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 7 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार राज्यव्यापी कोरोना लसीकरणाचा लसीचा शुभारंभ

“संभाजीनगर म्हणा, नाहीतर धाराशिव म्हणा; याकडे मी गांभीर्यानं बघत नाही”

“…म्हणून हेगडे देखील आता माझ्यावर आरोप करत असावेत”

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, फौजदारी गुन्हा नोंदवा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चाचं सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या