बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात 6 ते 6 संचारबंदीचा पहिलाच दिवस अन् कोरोनाबाधितांचा आकडा काळजाचा थरकाप उडवणारा!

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 5 हजार 720 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 3 हजार 293 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 44 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 9 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 837 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,83,819 इतकी आहे. तर पुण्यात 39 हजार 518 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 411 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,38,890 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 20 हजार 066 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आणि उद्यापासुन पुण्यात मिनी लाॅकडाऊन लावण्यात येणार असल्याची घोषणा आज पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. तुर्तास हा निर्णय पुढच्या 7 दिवसांसाठी घेण्यात आला असला तरी येणाऱ्या काळात परिस्थिती पाहुन त्यात वाढ केली जाऊ शकते.

थोडक्यात बातम्या – 

लसीकरणानंतर मद्यपान केल्यास विपरीत परिणाम होतात का? तज्ज्ञ डॉक्टरांचे स्पष्टीकरण

‘आयपीएल’ सुरू होण्यास फक्त 6 दिवस शिल्लक असताना; ‘या’ मैदानात खेळाडूंच्या आधी कोरोनाची ‘एन्ट्री’

हळद उतरली नाही तोच वाहिला रक्ताचा पाट, रक्तरंजीत घटनेनं सोलापूर हादरलं!

उद्धव ठाकरेजी, थोडा अभ्यास करत जा! चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंंत्र्यांना टोला

‘काही द्यायचं नाही आणि नियम लावायचे’; पुण्यातील मिनी लॉकडाऊनला भाजपचा कडाडून विरोध

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More