बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसचा मंत्री बदलणार???, सोनिया गांधींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन

नवी दिल्ली |  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिकामे आहे. त्यातच नविन विधानसभा अध्यक्ष निवडीची चर्चा रंगली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना फोन करत विधानसभा अध्यक्षपदाबाबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत खलबतं सुरू असून लवकरचं काँग्रेस पक्षाकडून अध्यक्षपदाचं नाव जाहीर करण्यात येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार संग्राम थोपटे (Sangram Thopte) आणि पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) या दोन नावांचा प्रस्ताव हायकमांडकडे देण्यात येणार आहे. या दोन नावांपैकी कुठल्या नावावर शिक्कामोर्तब करावा याकरिता सोनिया गांधी यांनी सहकारी पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंना फोन केल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचा मंत्री बदलणार असल्याची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या कोट्यात आहे. विधानसभा अध्यक्षांबाबत हायकमांड जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असं नाना पटोले म्हणाले होते. तसेच विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधील एका मंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे, असं सुचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. विधानसभा अध्यक्षपदी कोणत्या नेत्याची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदावर विरोधी पक्षांकडून मात्र अध्यक्षांची निवडणुक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याचे नियम का बदलले? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. तसेच एवढी सरकारला का भीती वाटते? सत्ताधारी आमदारांचा सरकारला पाठींबा आहे का? यावर सरकारचा विश्वास नाही. मग सरकारवर नियम रचनेत बदल करण्याची वेळ का आली? अशी प्रश्नांची सरबत्ती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“भाजपला लाज वाटली पाहिजे, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी”

भारतानं उडवला पाकिस्तानचा धुव्वा! आशिया कप स्पर्धेत पटकावलं कांस्य पदक

“हे बालिशपणाचं लक्षण, आपला बाप आजारी असताना…”, आव्हाड संतापले

“पंतप्रधान नरेंद्र मोदीही संसदेत नसतात, त्यामुळे त्यांचा चार्जही दुसऱ्याकडे द्या”

“राज्य नेमकं कोण चालवतंय?, रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार हे…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More