बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी आणि बाजारपेठेत नागरिकांची तुफान गर्दी

औरंगाबाद | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या भागांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्यांपेक्षा कमी आहे, अशा भागांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला.

आजपासून महाराष्ट्राने अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. परंतु, अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी पुणे, औरंगाबाद, नाशिक या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. याशिवाय, बाजारपेठांमध्येही नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचं दिसून आलं. सरकारने ठरवून दिलेले सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांनी बेजबाबदारपणे वागायला पुन्हा एकदा सुरुवात केल्याचं चित्र अनलॉकच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं.

औरंगाबादमधील गुलमंडी परिसरात अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. याशिवाय पैठण गेट, गुलमंडी तसेच निराला बाजार या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमध्येही मेन रोड परिसरातच वाहतूक कोंडी झाली, तसेच वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्त्यावर पाहायला मिळाल्या.

एकीकडे कोरोनाचं संकट अजूनही पूर्णपणे गेलेलं नसताना नागरिक मात्र पुन्हा एकदा बेफिकिरीने आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडवत वागत असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये मोबाईल, कपडे व भांडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. अशाच प्रकारे पुण्यातही बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं.

थोडक्यात बातम्या

“मायनसमध्ये जीडीपी, इंधन दरवाढ हे दोनदा निवडून दिल्यामुळे केंद्र सरकारचं रिटर्न गिफ्ट आहे”

रुसून गेलेल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केलं धक्कादायक कृत्य

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्याचा किटकनाशक घेत आत्महत्येचा प्रयत्न

सुरा घेऊन चोरी करायला आलेल्या 2 चोरांवर भारी पडली एकटी महिला डाॅक्टर

ह्रदयद्रावक! कोरोनानं मृत्यू झालेल्या वडिलांच्या मृतदेहास हात लावण्यासही मुलांचा नकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More