बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाढदिवसाला आई-वडिलांनी दिलेलं गिफ्ट पाहून मुलीलाही बसला धक्का, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली जेव्हापासून सगळीकडे कोरोनाने थैमान घातलं आहे. तेव्हापासून सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात घरातून बाहेर फारसं पडता येत नाही. तसेच समारंभ, कार्यक्रमाला जाता येत नाही. त्यानिमित्तानं सगळे नातेवाईक एकमेकांना भेटतील म्हणून आजकाल सगळेच वाढदिवस खूप मोठा करत असतात.

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, आपल्या मुलाचा वाढदिवस असला की आई-वडील त्या मुलासाठी खूप काही करतात. आई-वडील आपल्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. त्यांना वाढदिवसाच्या दिवशी पाहिजे ते आणि मागेल ते गिफ्ट देतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका मुलीला तिच्या आई-वडिलांनी दिलेलं गिफ्ट पाहून ती खूप चकीत झाली असल्याचं दिसून येत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका मुलीला तिच्या आई-वडिलांनी एक कुत्र्याचं पिल्लू दिलं आहे. एका लहान मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचे आई-वडिल तिच्यासाठी एक गिफ्ट आणतात. तिला बोलावून एक मोठ खोकं खोलायला सांगतात. ती मुलगी ते खोकं खोलत असते आणि तिला त्यामध्ये एक कुत्र्याच पिल्लू दिसतं. ते पाहिल्यावर तिला धक्काच बसतो. तिला खूप आनंद झाला असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत खूप लोकांनी पाहिला असून, अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

भंडाऱ्याची उधळण करत भाजप आमदार महेश लांडगेंचा डान्स, पाहा व्हिडीओ

दिल तो बच्चा है जी! कॅरम खेळता-खेळता दोन म्हताऱ्यांमध्ये तूफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्या तरूणाला नागपुरातून अटक!

‘…आता तुम्हीच सांगा मोदी साहेब?’; चिमुकलीनं थेट पंतप्रधानांकडे केली तक्रार, पाहा व्हिडीओ

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; संघाचा धाकड खेळाडू आयपीएलला मुकणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More