बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् त्या दिवशी माझा क्रिकेटमधील इंटरेस्टच संपला; आव्हाडांनी घेतली गावस्करांची फिरकी

मुंबई | भारतीय दिग्गज माजी खेळाडू आणि लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांना वांद्रेतील कुर्ला संकुलात म्हाडाच्या मालकीचा भूखंड उपलब्ध करून देण्यात आला होता. इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी ही जागा देण्यात आली आहे. भाजप सरकारच्या काळात हा भुखंड गावस्कर यांच्याकडून काढून घेण्यात आला होता. त्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात पुन्हा हा भुखंड गावस्कर यांना देण्यात आला. आता त्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.

जर सुनिल गावस्कर नसता तर कदाचित त्याला आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता. ज्या दिवशी सुनिल गावस्कर फिलिप्स डिफ्रायटेसच्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाला. त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेट मधील इंटरेस्टच संपला. स्टेडियममधून रडत बाहेर पडलो होतो, असं आव्हाड म्हणाले आहेत.

गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्करसाठी बदलला. आता तरी सुनिल गावस्करने तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच ईच्छा, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी सुनिल गावस्कर यांची फिरकी घेतली आहे.

दरम्यान, गेल्या 3 दशकापासून भूखंडावर काहीच काम झालं नसल्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांनी भूखंड म्हाडाने परत घ्यावा, अशी मागणी केली आहे. या संदर्भातील पत्रही त्यांनी म्हाडाला लिहिलं होतं. त्यानंतर आता हा वाद आणखीनच वाढताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

गाडी वेगाने पळवताय सावधान! उच्च न्यायालयाने घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय

आपली पोरं लय भारी! मराठमोळ्या अंदाजात मुंबई इंडियन्सचं नवं अँथम; पाहा व्हिडीओ

देशासह राज्यात घातपाताचा कट रचणाऱ्या संशयितांनी ‘या’ कॅम्पमधून घेतलं होतं प्रशिक्षण!

मेव्हणीसोबत पळाला, बायकोची आठवण आल्यावर तरूणाने केलं धक्कादायक कृत्य

आर्या खरंच गायकाला डेट करते का?; आर्या आंबेकरचा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More