सोलापूर | देशभर महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दराने उच्चांक गाठला असताना एका शहरात चक्क 1 रूपयाला 1 लिटर पेट्रोल मिळत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर (Solapur) शहरात 1 रूपयांत 1 लिटर पेट्रोल दिलं जाणार आहे. सोलापुरातील मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले असल्याने मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीने हा निर्णय घेतला आहे.
सोलापुरातील डफरीन चौकातील पेट्रोल पंपावर फक्त आजच्या एका दिवसासाठी नागरिकांना 1 रूपयांत 1 लिटर पेट्रोल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ बघता सोलापूरकरांसाठी हा निर्णय दिलासादायक आहे.
दरम्यान, सोलापुरात बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याची मध्यरात्री 12 वाजता पुजा व बुद्धवंदना करण्यात आली. बाबासाहेबांच्या जयंतीनिमीत्त सोलापूरातील विविध भागात दिवसभरात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून भव्य मिरवणूक देखील निघणार आहे.
थोडक्यात बातम्या-
अखेर NCB ला नवीन झोनल डायरेक्टर मिळाले; वानखेडेंच्या जागी ‘या’ अधिकाऱ्याची वर्णी
सुजात आंबेडकर राजकारणात येणार?, प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले
‘तुम्ही राज्य चालवताय, का हजामत करताय?’, राजू शेट्टी संतापले
पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे दर
रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख नीतू कपूरने केली जाहीर, पाहा व्हिडीओ
Comments are closed.