बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘फादर्स डे’ निमित्त रियानं मागितली वडिलांची माफी, म्हणाली….

मुंबई | आज जगभरात ‘फादर्स डे’ साजरा करण्यात येतोय. आपल्या आयुष्यातील सगळ्यात पहिले हिरो बनलेल्या आपल्या वडिलांसाठी असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस. प्रत्येकाच्याच आयुष्यात त्यांच्या वडिलांची एक वेगळी भूमिका असते. फादर्स डे निमित्त सर्वचजण आपल्या वडिलांसाठी स्पेशल दिवस बनवता यावा म्हणून प्रयत्न करतात. अशातच रिया चक्रवर्तीने देखील तिच्या वडिलांसोबत एक फोटो शेअर करत त्यांना ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जगभरात फादर्स डे साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्तानं सर्वसामान्य लोकांसोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील आपल्या वडिलांना फादर्स डे शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं केलेली पोस्ट सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

रियाने वडिलांसोबतचा एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे. सोबत भावूक पोस्ट लिहिली आहे. फोटो शेअर करत “फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा बाबा! तुम्ही माझी प्रेरणा आहात. मला माफ करा ती वेळ खूप कठीण होती, पण तुमची लहान मुलगी असल्याचा मला अभिमान आहे,” अशा आशयाचे कॅप्शन रियानं त्या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती कधी नव्हे इतकी चर्चेत आली होती. त्याच्या निधनानंतर तब्बल सहा महिन्यानंतर रिया महिला दिनी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झालेली पहायला मिळाली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

थोडक्यात बातम्या – 

चिंताजनक! देशातल्या ‘या’ राज्यात आढळला ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण

“सोनिया गांधींनी शब्द दिलाय, काँग्रेस शिवसेनेसोबत पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल”

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने विद्यार्थीनीनं उचललं धक्कादायक पाऊल!

गरज असेल तरच घराबाहेर पडा, नियमांचं पालन करा- अजित पवार

राज्य सरकारचे कान फाटतील एवढ्या जोरात आंदोलन करणार- पंकजा मुंडे

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More