बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्य सरकारने जाहीर केली नवी नियमावली, वाचा सविस्तर

मुंबई | गुढीपाडवा सण हा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असताना महाराष्ट्र सरकारतर्फे सण साजरा करण्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनानं थैमान घातलं असल्यामुळे राज्य शासनाकडून नियमावली जाहीर करून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.

राज्य सरकारच्या नियमावलीनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारची मिरवणूक अथवा मोटार सायकल रॅली काढण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच यावर्षीचा गुढीपाडवा सण साध्या पद्धतीने घरात राहूनच साजरा करावा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात पारंपारिक वेशभूषा परिधान करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्यामुळे राज्य सरकारने 13 एप्रिल म्हणजेच उद्या साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडवा या सणावर निर्बंध लादले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असंही नव्या नियमावलीत नमूद करण्यात आलं असून गुढीपाडवा सणाच्या दिवशी घरात राहून कुटुंबाबरोबरच हा सण साजरा करावा असं आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे. तसेच रक्तदान शिबिर वगैरे यांसारखे कार्यक्रम स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने करण्यात येऊ शकतात, असंही त्यात नमुद करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या

परीक्षा आताच घ्या अन्यथा… ; दहावी-बारावीचे विद्यार्थी आक्रमक

खासगी गुप्तहेराद्वारे दगा देणाऱ्या पतीला तिनं रंगेहाथ पकडलं

गतवर्षीचा वचपा काढण्यासाठी राहुलची ‘पंजाब किंग्ज’ तयार

गुजरातमधुन महाराष्ट्राला मिळणार रेमडेसिवीरचे 50 हजार डोस; भाजपची मोठी घोषणा

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षा अखेर पुढे ढकलल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More