मुंबई | अभिनेत्री उर्फी जावेद(Urfi Javed) तिच्या कपड्याच्या फॅशनमुळं नेहमीच चर्चेत असते. यामुळं उर्फी अनेकदा चर्चेचा विषय ठरते. यामुळं तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. मध्यंतरी हा वाद जास्त उफाळून आल्याचं देखील पाहायला मिळालं.
नुकताच उर्फीनं पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ उर्फीनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवरुन शेअर केला आहे. व्हॅलेंटाईन निमित्त उर्फीनं खास लूक केला आहे. या लूकमध्ये उर्फीनं टू-पीस घातला आहे. व्हॅलेंटाईन डे असल्यानं तिनं लाल रंगाचा टू-पीस घातल्याचा अंदाज आहे.
तिच्या या व्हिडिओनमुळं उर्फी पुन्हा चर्चेत आली आहे. उर्फीनं रेड टू पीसवर श्रग (Shrug) कॅरी केला आहे. तो श्रग तिनं डोक्यावर टाकला आहे. केस मोकळे सोडले आहेत. तिच्या या स्टाईलने सगळ्यांना झटका दिला आहे. काहींचं लक्ष तिनं गळ्यात घातलेल्या पेंडंटवर आहे. अनेकांनी तशी कमेंटदेखील केली आहे.
या व्हिडीओत तिच्या कमरेवरचा टॅटूदेखील दिसत आहे. उर्फीनं कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, मला व्हिक्टोरीयाच्या सिक्रेट माॅडेलसारखं वाटत आहे. ही पोस्ट मी नंतरदेखील डिलीट करु शकत नाही. उर्फीच्या या व्हिडीओवर प्रचंड कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्यांची हे समजायची कुवतच नाही’; चित्रा वाघ यांनी अंधारेंना सुनावलं
- प्रेम असावं तर असं; असा बनवणार हार्दिक अक्षयाचा व्हेलेंटाईन डे खास
- किचनमधील ‘या’ पदार्थाने सुरु करा बिझनेस; होईल लाखोंची कमाई
- “खंजीर कुठे कुठे घुसलाय हे एकदा तपासून बघावं लागेल”
- व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; खरेदी करण्याची हीच सुवर्णसंधी