Women’s Day निमित्तानं मुंबई पोलीस महिलांना मिळालं ‘हे’ खास गिफ्ट
मुंबई | आज जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. स्त्री गृहिणी असो वा वर्किंग वूमन, ती दैनंदिन आयुष्यात घरातील प्रत्येकासाठी कायम कष्ट करत असते. त्यामुळेच त्या स्त्रीचा गौरव करण्यासाठी आज 8 मार्च रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day) साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. महिला दिनाच्या निमित्तानं मुंबई पोलीस महिलाचे कामाचे तास कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या महिला आनंदी झाल्याचं दिसत आहे.
मुंबई पोलिसांवर कायमच कामाचा ताण असतो. याच कारणामुळे 12 तासांची ड्युटी त्यांना कागदोपत्री असली तरीही अनेकदा त्यांची ड्युटी 16 ते 24 तासांपर्यंत सुरूच रहाते. टप्प्याने संपूर्ण राज्यात 8 तासाच्या ड्युटीची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र मुंबईत अद्याप ती झालेली नव्हती. अशात आता महिला दिनाच्या निमित्ताने महिला पोलिसांना ही खास भेट देण्यात आली आहे.
दरम्यान, आज जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होत असून सगळीकडे उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे.
थोडक्यात बातम्या –
संजय राऊतांचं थेट पंतप्रधान मोदींना 13 पानी पत्र, म्हणाले…
पेट्रोल-डिझेल महाग म्हणून सीएनजी गाड्या घेतल्या, अशा लोकांना झटका देणारी बातमी
उत्तराखंडात आप ठरणार किंग मेकर, वाचा एक्झिट पोलचा अंदाज
‘…तरच युद्ध थांबेल’; रशियाच्या या नव्या चार अटींनी युक्रेनचं टेंशन वाढलं
“मी म्हातारा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होत नाहीत”
Comments are closed.