गौतमी पाटीलची क्रेझ; पठ्ठ्याने बायकोच्या वाढदिवशी ठेवला गौतमीचा डान्स शो

बीड | लावणी डान्सर गौतमी पाटीलची (Dancer Gautami Patil) क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रात आहे. गौतमीच्या लावणीला आणि तिला पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी होते. एवढंच नव्हे तर तिच्या कार्यक्रमात अनेक वेळा वाद देखील होत असतात. गौतमीच्या अश्लील डान्समुळे तिला अनेकांनी ट्रॉल केलं होतं.

त्यानंतर तिने सर्वांची माफी देखील मागितली होती. गौतमीने तिची कला फक्त शो पूर्तीच ठेवली नसून तिने दोन मराठी अलबम साॅंगमध्ये सुद्धा काम केलं. गौतमीचा कार्यक्रम ठेवायला आता कोणतच कारण लागत नाही. नेत्यांपासून ते लहान मुलांच्या वाढदिवसापर्यंत सगळे तिला अमंत्रीत करत असल्याचं पाहायला मिळतंय.

बीडमध्ये सुद्धा असाच एक प्रकार घडला. बीडमधील आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथे पत्तीने चक्क आपल्या बायकोच्या वाढदिवसाला गौतमीला बोलवलं.

इतकंच नव्हे तर गड्यानी गौतमीच्याच हातून बायकोचा केक कापला. एखाद्या महिलेच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा शो हा राज्यातला पहिलाच प्रयोग ठरला आहे आणि म्हणून गावात चर्चेला कारण मिळालं.

थोडक्यात बातम्या-

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी मोठी अपडेट समोर!

‘फक्त तुझा डीपी बघून आलो होतो’; रॅपिडो रायडरने मुलीला रात्री केला मेसेज

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; एकनाथ शिंदेंनी केली महत्त्वाची घोषणा

“मुलींना पैसेवाला बॉयफ्रेंड आणि नवरा हवा असतो, पण…”

…म्हणून रात्री झोपताना जोडीदाराबद्दल मनात राग ठेवून झोपू नका!