बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकीकडे संप सुरू, तर दुसरीकडे 6800 कर्मचारी कामावर परतले?

मुंबई | ऐन दिवाळीत महाराष्ट्रातील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं या महत्त्वाच्या मागणीसह वेतनवाढीच्या मुद्द्यावरून संप पुकारला आहे. सर्वसामान्यांना सणासूदीच्या काळात बस बंद असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. परंतु कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

एकीकडे संप सुरू असताना कर्मचारी कामावर परत आले असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. त्यामुळे गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारतर्फे कामावर परत रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच उच्च न्यायालयानेही हा संप बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.

एसटी महामंडळाने महाराष्ट्रातील विविध आगाराचे तब्बल 6 हजार 895 कर्मचारी कामावर रूजू झाले असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर 51 एसटी बसेस धावल्या असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा आकडा फक्त संपामध्ये फुट पाडण्यासाठी सांगितला जात आहे का?, असा प्रश्नही या वेळी कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.

उच्च न्यायालयाने 22 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. त्याचबरोबर आज न्यायालयाने गठीत केलेल्या समितीसोबत कामगार संघटनांची बैठक होणार आहे. आज होणाऱ्या या बैठकीत काही ठोस मार्ग काढले जातात का?, तसेच आज तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एसटी महामंडळाने केलेल्या दाव्यानुसार सोमवारी 1 हजार 317 प्रवाशांनी प्रवास केल्याचंही म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या

आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढल्या, कधीही होऊ शकते अटक

‘तुम्ही आधी तुरूंगातील जेवण घ्या’; अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका

‘हे’ राज्य पुन्हा एकदा लाॅकडाऊनसाठी सज्ज, न्यायालयात स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणून घ्या ताजी आकडेवारी

“एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करतायेत, हे दुर्दैव आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More