बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शहा यांनी बैठक बोलावली

मुंबई | दिल्लीत सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक होणार आहे. नक्षलवादवर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक हे सुद्धा बैठकीला उपस्थित असतील. बैठकीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत ही बैठक चालेल.

या बैठकीला जाण्यापूर्वी सोमवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत राज्यातील नक्षलवाद विषयक आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आता उद्धव ठाकरे राज्यातील नक्षलवादी कारवायांबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती देतील.

दरम्यान, गेल्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींशी जवळपास अर्धा तास व्यक्तीगत चर्चा केल्याने त्यांची दिल्ली वारी बरीच चर्चेत राहिली. सध्या पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत.

थोडक्यात बातम्या- 

कोणताही क्लास न लावता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशवंतने UPSC केली क्रॅक!  

“मोदींना टक्कर देऊ शकेल असा कोणता नेता असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत”

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

रोमांचक सामन्यात पंजाबचा दणदणीत विजय! सनरायजर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More