पुन्हा नशिबी फरपट? लॉकडाऊनची भीती, परप्रांतिय मजुरांची घराकडे जाण्यासाठी धावपळ!
मुंबई | मागील वर्षी कोरोना काळात आलेला अनुभव खूप भयानक होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक 24 मार्चच्या रात्री संपुर्ण देशात लाॅकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर सर्वांचीच धावाधाव झाली. परराज्यातून आलेल्या कामगारांना याची खूप मोठी झळ बसली. लाॅकडाऊन लागल्यानंतरही काही मजूर आपापल्या राज्यात चालत जातानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. सध्या महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन लागेल की काय? या भीतीने परप्रांतिय मजूर महाराष्ट्र सोडून घरचा रस्ता पकडताना दिसत आहे.
राज्यात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी लाॅकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गेल्यावेळेसारखं संकट पुन्हा येऊ नये यासाठी परराज्यातून आलेले कामगार पुन्हा परतीच्या वाटेवर निघाले आहेत. मिळेल त्या वाहनाने हे कामगार गावी जाताना दिसत आहे.
मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या शहरात मोठ्या प्रमाणात प्ररप्रांतिय कामासाठी येत असतात. यातील बहुतांश लोक हे रोजंदारीवर काम करत असतात. दिवसा केलेल्या कमाईवर ते रात्रीचं पोट भरतात. सरकारने लाॅकडाऊन करण्याआधीच सुचना द्यावी, जेणेकरून आमची उपासमार होणार नाही, असं या कामगारांचं म्हणणं आहे.
दरम्यान, लहान लहान कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांनी गावी जाण्यास सुरवात केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात दररोज 30 हजारांच्यावर रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात लाॅकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
थोडक्यात बातम्या-
सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!
कर्नाटकात भाजपला मोठा धक्का; ‘ऑपरेशन लोटस’ची चौकशी होणार
आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार- तृप्ती देसाई
“शिवसेना मी घराघरात पोहोचवली, मीच स्वत: राजीनामा देणार होते”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.