औरंगाबाद | यू-ट्यूबवर ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपार्ह गाणं प्रसारित केल्याने दोन जणांविरोधात औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पुरोहित संघटनेने याबाबत तक्रार नोंदवली आहे.
मुंबईतील सचिन म्हस्के आणि राजरत्न सावंत या कलाकारांनी ‘भटाची मस्ती जिरवायची’ हे गाणे तयार केले होते. हे गाणं यू ट्यूबवर 4-5 दिवसांपासून दिसत होते. त्याला 50 हजारहून अधिक लोकांनी पाहिले. ही बाब पुरोहित संघटनेच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
दरम्यान, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना लगाम लागण्यासाठी या कलाकारांनी जाहीर माफी मागावी, अशी या संघटनेची मागणी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-काश्मीरच्या जनतेला स्वातंत्र्य हवं आहे; काँग्रेस नेत्याची मुक्ताफळं
-राहुल गांधी मंदबुद्धी; भाजप खासदार सरोज पांडे यांचं वक्तव्य
-विखे-पाटील द्विधा मनस्थितीत; समजेना कोणत्या पक्षात जावे!
-अभिनेत्री काजोल चालता चालता पडली; पहा व्हायरल व्हीडिओ
-भाजप आमदाराच्या घरी प्रेयसीचा राडा; म्हणाली, “मी तुला सोडणार नाही!”
Comments are closed.