बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून वयाच्या अटीमध्ये बसत नसून देखील फडणवीसांच्या पुतण्याला लस दिली गेली!

मुंबई | विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने म्हणजेच तन्मय फडणवीसने कोरोनाची लस घेतल्यानं मोठी खळबळ उडाली होती. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षावरील लोकांना लस मिळत होती. मात्र तन्मय फडणवीस हा 45 वर्षाचा नसतानाही त्याला लस कशी काय देण्यात आली?, असा सवाल उपस्थित केला जात होता. आता माहिती आधिकारातून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सेव्हन हिल्स रुग्णालयात तन्मय फडणवीस याने कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. पहिल्या डोसनंतर मिळालेले प्रमाणपत्र दाखवून नागपूरमध्ये त्याने दुसरा डोस घेतला होता. मात्र, त्याला पहिला डोस कशाच्या आधारावर देण्यात आला? असा सवाल माहिती अधिकारातून उपस्थित करण्यात येत होता. त्याचं आता उत्तर समोर आलं आहं. तन्मय फडणवीस याने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याची माहिती दिली गेली आहे.

बारामतीमधील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारांतर्गत याबद्दलची माहिती मिळवली आहे. तन्मय फडणवीसच्या ट्विटर अकाउंटवर त्याने अॅक्टर असा प्रोफाईल माहिती लिहिलेला असताना त्याला आरोग्य कर्मचारी म्हणून लस कशी मिळाली?, असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे.

तन्मयने फडणवीसांचे पुतणे आहेत म्हणून त्यांना लस दिली की, अभिनेते आहेत म्हणून त्यांना लस दिली किंवा, आरोग्य सेवक आहेत म्हणून लस दिली की, त्यांनी खोटं आरोग्य सेवकाचं प्रमाणपत्र सादर करून लस घेतली?, असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईतील मालाड भागात चार मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना, 9 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटरची सेक्स टेप लीक, हॉटेलमध्ये बनवलेल्या या अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ लीक

जॉगिंग किंवा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताना मास्क वापरणं योग्य की अयोग्य?, जाणून घ्या!

बाप रे! पावसाच्या भयंकर रूपाने वाहतुकीचा महाराष्ट्रातील हा पूल लोकांच्या डोळ्यासमोर गेला वाहून

प्रसिद्ध अभिनेता बोमन इरानी यांच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More