मुंबई | शिवसेनेची धडाडती तोफ आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा एकदा ईडीची (ED) नोटीस आली आहे. यापूर्वी देखील त्यांना सक्तवसुली संचनालयाच्या (Enforcement Directorate) नोटीस आल्या होत्या आणि त्यांनी चौकशीसाठी हजेरी लावली होती. भाजप आणि शिंदे गटावर तुटून पडतात म्हणून राजकीय सुडबुद्धीने त्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला जातो आहे, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
संजय राऊत या समन्सचा मान राखत चौकशीसाठी जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ बांधकाम प्रकरणी भ्रष्टाचार केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. राऊत यांच्याकडून या चौकशीसंबंधी अजून कोणतीही प्रतिक्रिया प्राप्त झाली नाही.
मुंबईतील गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीवरील गाळेधारांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. गुरुआशिष कंस्ट्रक्शन प्रायवेट लिमिटेड या अस्थापनाने 40 एकर जमिनीवर पुनर्विकासासाठी प्रस्ताव मांडला होता. यात शासन आणि गुरुआशिष अस्थापनात काही करार झाले होते. त्या कराराप्रमाणे न वागता त्यात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आहेत.
गुरुआशिषचे माजी संचालक प्रवीण राऊत (Pravin Raut) यांना चौकशीसाठी ईडीने अटक केली होती. प्रवीण राऊतांच्या पत्नी स्वप्ना राऊत (Swapna Raut) यांनी संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्या बँक खात्यात 2010 साली 55 लाख रुपये एवढी रक्कम भरली होती, असे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. ईडीच्या नोटीस नंतर ते 50 लाख परत पाठविण्यात आले होते, त्याप्ररकणी संजय राऊत यांची चौकशी सुरु आहे.
थोडक्यात बातम्या –
फोन टॅपिंग प्रकरणी ईडीची सर्वात मोठी कारवाई!
“उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच मी अजित पवारांवर पातळी सोडून टीका केली”
‘शिंदे गट नाही गटार’; संजय राऊत बंडखोरांवर पुन्हा बरसले
सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; सोनं-चांदी झालं स्वस्त, वाचा ताजे दर
ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जा, उगाच टीव्ही समोर जाऊन नाटकं करू नका- उद्धव ठाकरे
Comments are closed.