पुणे। महाराष्ट्रात गौतमी पाटीलची (Gautmi Patil) चांगलीच चर्चा सुरु आहे. अगदी कमी वेळातच गौतमीने तरुणांच्या मनात स्थान निर्माण केलं. तिच्या अश्लील नृत्यामुळे अनेक जणांनी तिच्यावर टीका केली होती.
तरुणांना गौतमीचं इतकं वेड लागलं आहे की काही ठिकाणी अनेक वेळा तिच्या कार्यक्रमात गोंधळ उडाला. तिचा डान्स पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तसाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला.
पुणे येथे एका कार्यक्रमात राडा होऊन हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. वेताळेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्ताने गौतमीला आमंत्रीत करण्यात आलं तेव्हा रिमिक्स गाण्यांवर तरुणाई गौतमी समोर चांगलीच थिरकली. या कार्यक्रमात तरुणांनी एकमेकांच्या खांद्यावर बसून डान्स करत कार्यक्रमात चांगलाच गोँधळ घातला.
काही दिवसांपूर्वी गौतमी सोबत एक वाईट कृत्य घडलं. पुणे येथे गौतमीचा शो ठेवला होता. या वेळेस गौतमीच्या चेंजिंग रूममध्ये कोणीतरी तिचा व्हिडीओ चोरून शूट केला आणि त्यानंतर तिचे फोटोज आणि व्हिडीओ व्हायरल केला. .
थोडक्यात बातम्या-
पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर RPI ने फडकवला झेंडा!
“एवढ्या वर्षाच्या भ्रमातून कसबा बाहेर आला, आता देशही बाहेर पडेल”
Who is dhangekar?; धंगेकरांच्या विजयानंतर चंद्रकांत पाटलांचा व्हिडीओ तुफान व्हायरल
“भाजपची उलटी गिनती सुरू झालीये”
कसब्यातील भाजपच्या पराभवावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…