बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! SBI चा ग्राहकांना मोठा झटका, आता…

मुंबई | भारतीय रिझर्व बँकेने (RBI) रेपो (REPO Rate) दरात वाढ केल्याने जवळपास सर्वच बँकांनी आपले व्याजदर (Interest Rate) वाढवले आहेत. आता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) देखील आपल्या कर्ज दरात वाढ केली आहे. त्यामुळे नवीन आणि जुन्या ग्राहकांच्या कर्जावरील व्याजदर आता वाढणार आहे. त्यामुळे आधीच महागाईचे चटके सोसणाऱ्या नागरीकांना आता व्याजदरवाढीचा देखील फटका बसला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडींग रेट (MCLR) वाढवल्याने कर्जाचे व्याजदर वाढणार आहेत. होमलोन, कारलोन, पर्सनल लोन हे आता आधीपेक्षा जास्त व्याजदराने मिळतील. हे नवीन दर येत्या शुक्रवारी 15 जुलै पासून लागू होणार आहेत. यापूर्वी देखील स्टेट बँकेने जूनमध्ये MCLR वाढवले होते.

स्टेट बँकेने जारी केलेल्या नवीन व्याजदरानुसार एक वर्षाच्या कर्जासाठी MCLR 7.40 वरुन 7.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. सहा महिन्यांच्या कर्जासाठी 7.35 वरून 7.45 टक्के करण्यात आला आहे. तर दोन आणि तीन वर्षांसाठी MCLR 7.70 टक्क्यांवरुन वाढवून 7.80 टक्के केला आहे. स्टेट बँक या वर्षीच्या जूनपासून MCLR वाढवत आहे. जूनमध्ये बँकेने MCLR 20 बेसिस पॉईंटने वाढवला होता.

MCLR म्हणजे बँकेच्या कर्जाचा बेंचमार्क आहे. यामुळे बँकेच्या कर्जाचा व्याजदर कमी जास्त होतो. महागाईवर (Inflation) नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व बँक (RBI) याचा प्रभावी उपयोग करते.

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो”

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे भाज्या महागल्या; दर आणखी वाढण्याची भीती

रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली!

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शकाचा राहत्या घरी आढळला मृतदेह

सुष्मिता डेट करत असलेल्या ललित मोदीची संपत्ती आली समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More