बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुळशीतील रासायनिक कंपनीत पुन्हा एकदा आगीचा थरार; आज सकाळी पुन्हा आग भडकली

पुणे | पुणे जिल्ह्यातील मुळशीच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या रासायनिक कंपनीला काल भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 18 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आगीचा हा थरार काल अग्निशामन दलाने आटोक्यात आणला असला तरी आज सकाळपासून कंपनीत पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळत आहे.

मुळशीतील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीनंतर आता या कंपनीतील गोडाऊनमधील साहित्याने पेट घेण्यास आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरात आणखी भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने डीएनए टेस्ट करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्याची प्रक्रिया होईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

या आगीमध्ये मृत पावणाऱ्या कर्मचारी व कामगारांचे मृतदेह नातेवाईकांना देण्यासाठी साधारण 2 दिवसांचा कालावधी लागू शकतो असं स्पष्ट करण्यात आलं आहे. मुळशीतील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजी या कंपनीत ही दुर्दैवी घटना काल दुपारी घडली. त्यानंतर आज सकाळपासून गोडाऊनमधील साहित्याने पेट घेतल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू आहेत.

रासायनिक कंपनीत लागलेल्या आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 5 लाखांची आर्थिक मदत पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहे. तसेच पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित घटनेची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. कंपनीच्या मालकाला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

थोडक्यात बातम्या

“मोठया पवारांकडून पत्र चोरत असताना अजित पवारांसोबत भाजपचे कोण कोण लोक होते?”

आनंदाची बातमी! गेल्या 24 तासात ‘या’ शहरात एकही कोरोना बळी नाही, दिवसभरात फक्त 15 नवे रुग्ण आढळले

‘या’ शहरातील 45 वर्षांच्या पुढील नागरिकांचं घरीच होणार लसीकरण; मोहीम राबवण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या

कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ व्यक्तींसाठी नियमात बदल

“एकीकडे राज्याने कोकणाला 252 कोटींची मदत केली, पण केंद्राची कमिटी आली अन् जेवणावर ताव मारला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More