बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकेकाळी सर्वाधिक कोरोना मृत्युदर असणारा ‘हा’ देश बनला युरोपातला पहिला मास्क फ्री देश

नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षात संपुर्ण जगालाच कोरोनाची मोठी झळ बसली होती. तर 2020 मध्ये देखील अमेरिका युरोपसह इतर आशियाई देशांना महामारीची झळ बसली होती. आशिया खंडातील देशात भारत सर्वाधिक रुग्ण संख्या होती. मात्र आता कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र समोर येत आहे. सध्या भारत मास्क फ्री झाला नसला तरी युरोपात काही देश त्या दिशेनं वाटचाल करत आहेत.

कोरोना महामारीत इटली देशाला देखील कोरोनाची सर्वाधिक झळ बसली होती. कोरोनामुळे इटलीतील लोकांची दयनीय अवस्था झाली होती. मात्र हाच देश आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेनं सकारात्मक पाऊलं उचलत आहे. इटलीत आता घरातून बाहेर पडताना मास्क लावण्याची गरज नसल्याचं घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे इटली हा देश यूरोपातील पहिला मास्क फ्री देश झाला आहे.

इटलीच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इटलीतील 20 राज्यांचा ‘लो कोरोना रिस्क गटात’ समावेश करण्यात आला आहे. इटलीच्या अनेक शहरात आता कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आली आहे. इटलीने सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर, लसीकरण या गोष्टी सक्तीने पाळल्या होत्या, त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात रूग्णघट झालेली पाहायला मिळत आहे.

दरम्यान, भारतात सध्या कोरोना रूग्णसंख्या कमी होत असली तरी नव्या व्हेरियंटचे धोके वाढत आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस या कोरोना व्हेरियंटमुळे पुन्हा निर्बंध वाढवलेले आहेत. भारतात सध्या केवळ 20 टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. कोरोनाची येणारी लाट थोपवण्यासाठी 70 टक्के नागरिकांचं लसीकरण करण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“विधानसभेच्या अध्यपदासाठी आमचा काँग्रेसला पाठिंबा”

मोठी बातमी! 24 तासात जम्मू-काश्मिरात आढळून आले 2 संशयास्पद ड्रोन

अन् त्या महिलेवर कॅमेरा फोकस होताच प्रेक्षकांनी सुरू केला टाळ्यांचा कडकडाट

“आता वाटायला लागलंय मुख्यमंत्र्यानाच तिसरी लाट हवी आहे”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्‍णालयात दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More