बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकेकाळी काम मागण्यासाठी अंधेरीत दिवस-रात्र फिरायचो आता…- पंकज त्रिपाठी

मुंबई | चित्रपटसृष्टीत छाप उमटवणं तसेच काम मिळवणं प्रचंड कठीण असतं. अशातच एकेकाळी आपण देखील काम मागण्यासाठी अंधेरीला दिवस-रात्र फिरायचो, असं प्रसिद्ध कलाकर पंकज त्रिपाठी यांनी सांगितलं आहे. पंकज यांनी मिरझापूर या वेब सिरीजनंतर लोकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे.

पंकज आपल्या पत्नीसोबत मुंबईमध्ये स्थलांतर झाल्यानंतर आंधेरीच्या या स्टुडीओतून त्या स्टुडीओमध्ये फिरुन काम शोधायचे. मात्र तब्बल 6 वर्षे त्यांना नीट काम मिळालं नसून जास्त मानधन देखील मिळत नव्हतं. यादरम्यान त्यांच्या पत्नी घराची आर्थीक जबाबदारी सांभाळत होत्या. 2006 ते 2010 या काळात पंकज यांनी प्रचंड खडतर प्रवास केला असल्याचं त्यांनी अनेक वेळा मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

प्रचंड मेहनत केल्यानंतर पंकज यांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘मिर्झापूर’, असे अनेक सुपरहिट चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर पंकज यांनी केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे तर ओटीटी प्लॅटफाॅर्मवर देखील धुमाकूळ घालत लोकांचं मन जिंकलं आहे. त्यानंतर त्यांना आता पार्किंगमध्ये दिग्दर्शक गाठ धरुन कामाचे ऑफर्स देतात, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, एका मुलाखतीवेळी एकेकाळी काम मिळवण्यासाठी आंधेरीत दिवस-रात्र फिरायचो आणि आता दिग्दर्शकांची रांग लागते, असं त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. यावेळी जर त्रिपाठींनी नकार दिला तर निदांत आमची स्टोरी तरी ऐका अशी मागणी दिग्दर्शक करतात, असं देखील पंकज यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; ठोठावला ‘इतक्या’ लाखांचा दंड

“पेगॅससची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं”

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची हॅट्रिक; उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर!

जयंत पाटलांच्या तब्येतीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More