बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कंगाल पाकिस्तानला भारत देणार कोरोना लसीचे इतके कोटी डोस!

नवी दिल्ली | पुण्याची कंपनी सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेली ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेकाची लस आता पाकिस्तानलाही पाठवण्यात येणार आहे. भारताविरुद्ध कायमच कटकारस्थान करणाऱ्या पाकिस्तानला भारतातर्फे कोरोना लसीचे डोस पाठवण्यात येणार असल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

जगभरातील गरीब देशांना कोरोना लस उपलब्ध करून देण्यासाठी ‘दि ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्यूनायजेशन’ या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. याच संघटनेद्वारे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये बनविण्यात येत असलेल्या ऑक्सफर्ड लसीचे जवळपास 1.6 कोटी डोस पाकिस्तानला पुरवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला नेहमीच भारताने मदत केली आहे. दहशतवादाला पैसे पुरवून कंगाल झालेल्या पाकिस्तानला चीनने मोफत कोरोना लसीचे काही डोस दिले होते. त्यामुळे फुकट लस मिळण्याच्या अपेक्षेत पाकिस्तानी सरकार नागरिकांसाठी लस विकत घेणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं.

जगभरातील अनेक देशांना भारतीय लसीचे कोट्यवधी डोस देण्यात आले आहे. तसेच कोणाच्या संकटात भारताने वैर बाजूला ठेवून पाकिस्तानला लसीची केलेली मदत ही नक्कीच स्तुत्य आहे. पाकिस्तानने भारताला लसीची मागणी केली नाही. परंतु, भारत ‘दि ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्यूनायजेशन’द्वारे पाकिस्तानला लस उपलब्ध करून देत आहे.

थोडक्यात बातम्या-

…तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाहीत- निलेश राणे

उधारीचे पैसे मागणं पडलं महागात; विधवा महिलेसोबत घडली अत्यंत धक्कादायक घटना

गेल्या 10 दिवसांपासून जळतंय ओडिसाचं जंगल; हजारो प्राण्यांच्या जिवाला धोका

…अन् भर पत्रकार परिषदेत खासदारानं महिला आमदाराच्या गालाला लावला हात, पाहा व्हिडिओ

पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचा पेच अखेर सुटला; ‘या’ तारखेपासुन परीक्षेला सुरूवात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More