बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दीड वर्षाचं काम 15 दिवसात करणार’; नितीन गडकरींनी दिला शब्द

मुंबई | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे केंद्र सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. मागील 7 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक प्रकल्पांना फक्त मंजुरीच दिली नाही, तर अनेक प्रकल्प पूर्ण देखील करून घेतले आहेत. त्यातच आता एका कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांनी केलेल्या एका वक्तव्याने त्यांच्यातील आत्मविश्वास दिसून येतोय.

पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून काही अंतरावर असलेल्या इमेरजन्सी लाँडिंग फिल्डचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. या उद्घाटनावेळी नितीन गडकरी एक शब्द दिला. सशस्त्र दलाच्या विमानांसाठी इमेरजन्सी लाँडिंग फिल्ड दीड वर्षात नाही तर 15 दिवसात पुर्ण करून दाखवतो, असं गडकरी यांनी यावेळी म्हटलं आहे.

काल वायूसेना प्रमुख माझ्याकडे आले. त्यावेळी त्यांनी सांगितलं बाडमेरमधील ही लँडिंग फील्ड बांधण्यास दीड वर्ष लागली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं, आम्ही तुम्हाला चांगल्या दर्जाच्या लँडिंग फील्ड दीड वर्षात नाही तर 15 दिवसात बांधून देऊ, असं गडकरी यांनी भाषणावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, सशस्त्र दलाने या ठिकाणी लहान लहान विमानतळं बांधली पाहिजेत, असा सल्ला देखील गडकरींनी यावेळी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

नाशिक पोलिसांचा मास्टर प्लॅन! हेल्मेट न घालणं जीवावर नाही तर कानावर बेतणार

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

आपल्या वाढदिवसादिवशी आईच्या आठवणीत अक्षय झाला भावूक, पोस्ट करत म्हणाला….

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपने केलंय खास सेलिब्रेशन प्लॅनिंग

नितेश राणे आणि नीलम राणे यांच्यावरोधात लुकआऊट नोटीस जारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More