बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात एका पाठोपाठ एक गुन्हा! बदला घेण्यासाठी रचला फिल्मी कट, पेटवली कार

पुणे | या आठवड्यात पुण्यात एका पाठोपाठ गुन्हे होत असल्याचं समोर येत आहे. काही दिवसांपुर्वी मध्यरात्री पोलीस हवालदाराची हत्या झाल्याची माहिती समोर आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास चालू असताना त्याच मध्यरात्री बुधवार पेठेतील एका देह विकणाऱ्या महिलेचा मृतदेह अढळला. इतकच नाही तर त्याच्या दुसऱ्या दिवशी एक तरुणाची हत्या करण्यात आली आणि काल मध्यरात्री एका महिलेची हत्या झाली. या सर्व घटना ताज्या असतानाच एका कारला आग लावल्याची घटना समोर आली आहे.

संबंधित घटना ही पुण्यातील शिक्रापूर येथील वढू बुद्रूक येथील आहे. पांडुरंग गायकवाड आणि छुगेरा या दोघांमध्ये जमिनीच्या विषयावरुन वाद चालू होता. यादरम्यान तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा धोका निर्माण होईल, अशी माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलीस ठाण्याचे हवालदार पंडित मांजरे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. वाद चालू असतानाच वादाच्या ठिकाणापासून काही अंतर दूर उभ्या असलेल्या कारला आग लागल्याचं हवालदार मांजरे यांना दिसलं. त्यानंतर मांजरे यांच्यासह अनेकजण पेटत्या कारकडे धावून गेले.

कारला लागलेली आग विजवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. या आगीमुळे कारचं प्रचंड नुकसान झालं असून या कारला आग लावण्याआदी त्याच्या काचा लोखंडी हत्यारानं फोडण्यात आल्या होत्या.

दरम्यान, पोलीस हवालदार पंडित संपतराव मांजरे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी चार अज्ञात युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी आणि हवालदार प्रशांत गायकवाड करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

…तर हसन मुश्रीफांना मलाच विकावं लागेल- चंद्रकांत पाटील

लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबत नाही- राहुल गांधी

शिवसेनेच्या माजी आमदाराचं बंड; पंढरपूरनंतर आता देगलूरही महाविकास आघाडीच्या हातातून जाणार का?

ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या वृद्ध महिलेनं युवकासाठी सोडला स्वतःचा बेड, म्हणाल्या….

पुण्यातील हत्येचं सत्र सुरूच; साताऱ्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या आईची पुण्यात हत्या

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More