मुंबई | मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई बंदवर दिग्दर्शक केदार शिंदेंनी संताप व्यक्त केला आहे. जातीपातीच्या राजकारणात आपला श्वास बंद होईल, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
बंद दरम्यान कोणतीही हिंसा न करता शांततेत आंदोलन करणार, असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने केले होते. सकाळी मात्र ठाण्यातील आंदोलकांनी टीएमटीच्या बसची तोडफोड केली. तसंच रोडवर टायर जाळण्यात आले.
दरम्यान, मराठा आंदोलन हिंसक वळण घेत आहे. त्यामुळे आरक्षणापेक्षा आपलं रक्षण महत्त्वाचं आहे. कोणाकडून अपेक्षा ठेवायची?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
https://twitter.com/mekedarshinde/status/1021999079272980480
महत्त्वाच्या बातम्या–
-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!
-हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
-मुंबई पुणे महामार्गावर दगडफेक; पोलिसांचा हवेत गोळीबार
-सत्तेची चावी भाजपकडे द्या, मग तिजोरी उघडू- रावसाहेब दानवे
-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!