बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एक हात गळ्यात दुसरा छातीवर; पतीला कल्पनाही नव्हती की पत्नीच्या डोक्यात काय शिजतंय!

लखनऊ | उत्तरप्रदेशातील आजमगढ जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याच दिराच्या प्रेमात पडलेल्या महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून स्वतःच्याच पतीची हत्त्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये आरोपी महिलेच्या मृत पतीचं नाव दिनेश असून संबंधित महिलेचं नाव मीना असं आहे. तसेच दिनेशचा चूलत भाऊ अर्थात महिलेच्या प्रियकराचं नाव विपिन असं आहे.

मीना आणि दिनेशच्या लग्नाला दीड वर्षे पुर्ण होण्याआधीच त्यांचे संबंध काहीसे बिघडू लागले होते. यादरम्यान मीना आणि विपिनचे प्रेम संबंध चालू झाले. त्या दोघांमधील हे प्रेम दिवसेंदिवस इतकं वाढू लागलं की, दिनेश त्यांच्या नात्याच्या आड येत असल्याची भावना त्या दोघांमध्ये निर्माण झाली. निर्माण झालेल्या या भावनामुळे दोघांनीही दिनेशची हत्त्या करण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी अगदी रितसर कट रचला.

त्यांच्या रचलेल्या कटानुसार होळीच्या दिवशी मीना आणि दिनेशने टेरेसवर जाऊन झोपायचं ठरवलं. दिनेश रात्री गाढ झोपला असताना त्याची पत्नी मीना तिचा एक हात दिनेशच्या गळ्याभोवती तर दुसरा हात त्याच्या छातीवर ठेऊन झोपली होती. इतक्यातचं विपिनने दिनेशच्या गळ्यावर तिक्ष्ण बांबूने हल्ला केला. हल्ला करताच त्याचा आवाज कोणाला ऐकू न जावा यासाठी मीनाने दिनेशच्या गळ्यावरच्या तिच्या हाताने त्याच तोंड दाबलं. त्यानंतर पुन्हा एकदा दिनेशच्या गळ्यावर वार करण्यात आला ज्यामुळे तो जागीच मृत पावला.

दरम्यान, कोणालाही संशय न यावा या दृष्टीने मीनाने स्वतः वर देखील चाकूने वार केला होता. तसेच दिनेशची हत्त्या तीन अज्ञात लोकांनी केली असल्याचं मीनाने सगळ्यांना सांगितलं होतं. मात्र पोलिसांना मीनावर संशय येताच तिला चौकशीसाठी नेण्यात आलं. यादरम्यान मीनाने सारी हकीकत सांगून आपला गुन्हा कबुल केला.

थोडक्यात बातम्या-

विठुरायाच्या दर्शनासाठी आता कोरोना टेस्ट बंधनकारक नाही!

झुम कॉल सुरू असतानाच बड्या राजकीय नेत्याची पत्नी आली नग्नावस्थेत, व्हिडीओ व्हायरल

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिलासादायक

मोठी बातमी! महाराष्ट्रात लाॅकडाऊन अटळ; वृत्तपत्र संपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

दहावीच्या विद्यार्थिनीवर गॅंगरेप करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घातली गोळी!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More