बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आपलेच प्रश्न आपलीच उत्तरं, मुलाखत नाही हा घरचा मामला”

मुंबई | सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा काही भाग समोर आला आहे. उद्धव ठाकरेंनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले. यावर भाजप, शिंदे गट व मनसेचे नेते जोरदार टीका करीत आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीही ही कसली मुलाखत, आपलेच प्रश्न आपलीच उत्तरे सगळा घरचाच मामला अशा शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तुम्ही आजपर्यंत ज्या कपटाने इतरांसोबत वागला तसेच आता तुमच्यासोबत होत आहे. कर्माची फळे इथेच भोगायची आहेत. अडीच वर्षे संपत्ती कमवली आता सिंपथी कमवायची आहे. नियतीचं चक्र पूर्ण करायचं आहे. तुम्ही मनसेचे सहा नगरसेवक फोडले आता तुमचे आमदार फुटले.

अमित ठाकरेंची (Amit Thackeray) तब्येत ठीक नव्हती तेव्हा राजसाहेब त्यात व्यस्त होते, त्यावेळी तुम्ही मनसेचे (MNS) सहा नगरसेवक फोडण्याचे पाप केले, तेव्हा शिवसेनेने ‘सर्जिकल स्ट्राइक’ असा उल्लेख केला आणि आता तुम्हाला सिंपथी पाहिजे. आता तुम्ही म्हणता सन्मानीय बाळासाहेब ठाकरेंचे नाव कशाला वापरता पण जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी महापौर बंगला मागितला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र सोबत होता. मुळात बाळासाहेब एक विचार आहेत आणि विचारांवर कोणा एकाचा हक्क नसतो. बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण देशाचे नेते आहेत, असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

तुम्ही स्वत:ला बेस्ट मुख्यमंत्री म्हणवून घेता, उद्धव ठाकरें स्वत:ला सर्वाेत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणवून घेता. कोणी सांगितले तुम्ही बेस्ट आहात, सर्वेक्षण करणाऱ्या संस्था देखील तुमच्या आहेत. आपणच अशा बोगस संस्था उभारायच्या आणि आपणच स्वत:ला चांगलं म्हणवून घ्यायचं असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

“स्त्रियांना त्यांचं शरीर दाखविण्याचा अधिकार आहे तर पुरूषांना का नाही?”

तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी; ‘इतक्या’ पदांसाठी भरती, वाचा सविस्तर

‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही’; बंडखोर आमदाराने उद्धव ठाकरेंना सुनावलं

न्यूड फोटोशूट करणं अभिनेता रणवीर सिंगला पडलं महागात!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More