बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एक ही तो दिल है, कितनी बार जितोगे, नीरजकडून ऑलिम्पिक पदक मिल्खा सिंग यांना समर्पित!

मुंबई | तब्बल शंभर वर्षांहून अधिक कालावधीपासून सुरू असलेली भारताच्या अ‍ॅथलेटिक्समधील सुवर्ण पदकाची प्रतीक्षा अखेर शनिवारी संपली. नीरज चोप्रा याने भालाफेकीत सुवर्ण फेक करत भारताला अ‍ॅथलेटिक्स फील्ड अ‍ॅण्ड ट्रॅक प्रकारात पहिलंवहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं.

नीरजने हे पदक दिवंगत दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना समर्पित केलं आहे. मी हे पदक मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. ते जिथे कुठे असतील त्यांनी मला खेळताना नक्की पाहिलं असेल, अशी मी आशा करतो, असं नीरज म्हणाला.

नीरज चोप्राने ऐतिहासिक सुवर्ण पदकासाठी भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांची इच्छा पूर्ण केली. नीरजची कामगिरी मिल्खा सिंग यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरली. 18 जून 2021 रोजी मिल्खा यांचे कोरोनामुळे निधन झालं होतं. नीरजच्या आधी ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांची कामगिरी भारताकडून सर्वोत्तम ठरली होती.

पहिल्याच प्रयत्नात 87.03 आणि नंतर दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटरची भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावलं. नीरज चोप्रा हा सुरुवातीपासूनच भालाफेकीत पदकाचा दावेदार मानला जात होता.

थोडक्यात बातम्या-

“जाऊ तिथं खाऊ असं काम महाविकास आघाडी सरकारचं काम”

नरेंद्र मोदींचा नीरज चोप्राला फोन, कौतुक करत फोन ठेवताना म्हणाले…

दिलासादायक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, वाचा आकडेवारी

‘मोटा सरपंच’ म्हणून हिणवलं जाणाऱ्या नीरजने करोडो भारतीयांचं स्वप्न केलं साकार; नीरजची रंजक कहाणी!

भारताची सुवर्णयुगाला सुरूवात, नीरज चोप्राचं कौतुक करायला शब्द नाहीत- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More