बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धडकी भरवणारा अपघात! चेकपोस्ट टाळण्यासाठी केलेल्या स्टंटबाजीने एकाचा जागीच मृत्यू, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | तेलंगणामधील मंचेरिअल जिल्ह्यातील जन्नाराममध्ये चेकपोस्ट तपास टाळणं तरूणांना महाग पडलं आहे. यामध्ये एका तरूणाचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे. या धडकी भरावणाऱ्या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मंचेरिअल जिल्ह्यातील जन्नाराममध्ये वन विभागाचा चेकपोस्ट आहे. या चेकपोस्टला वन अधिकार वाहनांची तपासणी करत होते. 22 मे ला दोन तरूण एका बाईकवरून अतिशय वेगाने येत होते. त्यावेळी वन अधिकाऱ्याने हातवारे करून त्यांना थांबण्याची सूचना केली. मात्र तरीही दुचाकीस्वारानं वेग कमी केला नाही. उलट त्याने चेकपोस्टवरील तपासणी टाळण्यासाठी आपला वेग आणखी वाढवला. हे अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी चेकपोस्टवर शक्य तितक्या वर नेण्याचा प्रयत्न केला.

अधिकाऱ्यांनी वर केलेल्या चेकपोस्टखालून गाडी चालवत असलेल्या तरूणाने आपली मान खाली केली. त्यामुळे मान खाली केलेला तरूण वाचला खरा पण त्याच्या मागे बसलेल्या अंदाज आला नाही आणि त्यामुळे तो  चेकपोस्टला धडकला. ही धडक इतकी जोरात होती की त्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. सुदावेनी व्यंकटेश गौड असं मृत तरूणाचं नाव असल्याचं समजत आहे.

दरम्यान, दुचाकी चालवत असलेला तरूणाचं नाव बंडी चंद्रशेखर असून तो कोत्थाकुम्मूगुदेम गावाचा रहिवासी आहे. दुचाकी चालवणाऱ्या तरूणीने गाडी थांबवली असती तर अपघात झाला नसता आणि सुदावेनीचा मृत्यू झाला नसता.

 

थोडक्यात बातम्या- 

“सगळा गाढवपणा हा सरकारनं केला आहे अन्…”; विनायक मेटेंचा राज्य सरकारवर घणाघात

दहावी परीक्षेच्या निर्णयाबाबत राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम; लवकरच अंतिम निर्णय येण्याची शक्यता

कौतुकास्पद! हॉस्पिटलमधील पगाराची नोकरी सोडून स्मशानात करते असं काम की तुम्हालाही वाटेल अभिमान

खोटं वय सांगून केलं प्रेम, अल्पवयीन मुलाचे शरिरसंबंध अन् पुढे घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

“फोन परत द्या, मोबाईलमध्ये माझ्या आईच्या आठवणी आहेत”; 9 वर्षाच्या मुलीचं भावनिक पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More