मुंबई | महाराष्ट्रातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जाणार, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
कोरोनामुळे राज्य शासनाच्या भरवशावर राहून घर बांधली जाऊ शकणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरुन पोलीस विभागातूनच घर बांधली जाईल, असं अनिल देशमुख म्हणाले.
राज्यात पोलिसांसाठी घरं कमी आहेत. त्यामुळे ते बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. एखादा बिल्डर आपल्या जागेवर पोलिसांसाठी घर बांधून देत असेल, तर त्याला त्याला 4 एफएसआय आणि इतर सुविधा देण्याचा विचार सुरु आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
ही सर्व घरं पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या नावानेच बांधली जाणार आहेत. जवळपास एक लाख घरं महाराष्ट्र पोलिसांसाठी बांधण्याची तयारी आम्ही केली आहे, असं अनिल देशमुख म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली- अतुल भातखळकर
लेकीला शिकवा, तिच्या पंखांना बळ द्या- अमृता फडणवीस
“कुणाला काय द्यायचं ते द्या, पण आमच्या हक्काचं आम्ही सोडणार नाही”
मनसे आमदार राजू पाटील नितीन गडकरींच्या भेटीला!
सिरमचे संस्थापक माझे मित्र, कोरोना लस घे म्हणाले पण…- शरद पवार
Comments are closed.