बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला”

मुंबई | राज्यात मुसळधार पावसामुळे गेल्या आठवड्यात सातारा, सागंली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरड दुर्घटनेमध्ये अनेक नागरिकांनी आपला प्राण जीव गमावला आहे. त्यासोबतच अनेकांच्या घरात-दुकानात पाणी आल्याने प्रचंड नुकसान झालं. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदारांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या झालेल्या बैठकीत भाजपच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

भाजपच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्यांचं एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करुन घ्यावं. पूरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत शासनाने करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करत आहोत, असंही ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. मात्र तरीही सरकारने आपले निर्बंध कमी केलेले नाहीत. नागरिक, व्यापारी या निर्बंधांना वैतागले आहेत. त्यामुळे आता या निर्बंधांना न जुमानता व्यवहार चालू करण्याशिवाय आता पर्याय नसल्याचं भावना जनसामान्यांमध्ये वाढू लागली असल्याचं म्हणत भाजपने सरकारवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या-

काळजाचा ठोका चुकवणारी घटना!; विहिरीत पडलेल्या सासूला वाचवण्यासाठी सुनेनं…

पीव्ही सिंधूकडून पदकाची आशा कायम; प्री- क्वाॅर्टर फायनलमध्ये धडक

‘आता माघार नाहीच’; शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह 14 पक्ष एकवटले

“पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार खुर्ची बचाव कार्यात व्यस्त आहे”

अभिमानास्पद! युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत ‘या’ 2 भारतीय वास्तूंची निवड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More