पुणे | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर 8 एप्रिल रोजी चप्पलफेक व दगडफेक करत हिंसक आंदोलन केलं. या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे सूत्रधार म्हणून वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना मुंबई पोलिसांनी अटक केली.
मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सदावर्तेंना आधी सातारा आणि त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ होत असताना त्यांच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) सदावर्तेंविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल करावा, असा अर्ज राष्ट्रवादीच्या वतीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात देण्यात आला आहे.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील (Jayshri Patil) यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच या दोघांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला तर सदावर्तेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
रशियाची मोठी खेळी, रशिया-युक्रेन युद्ध आणखी चिघळणार?
राष्ट्रवादीच्या आमदाराकडूनच पक्षाला घरचा आहेर, उचललं ‘हे’ मोठं पाऊल
“राष्ट्रवादीच्या या ‘तुकडे तुकडे गँग’ला शरद पवारांनी सांभाळावं”
“देवेंद्र फडणवीसांना तेव्हाच सुबुद्धी आली असती तर कदाचित…”
महाराष्ट्र अंधारात जाणार?, मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.