बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

… तर कोरोनाची आणखी एक लाट येईल, कोविड टास्क फोर्स अधिकाऱ्यांनी दिली धक्कादायक माहिती

नवी दिल्ली | साधारण दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकुळ घातला. देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचं दिलासादायक चित्र सध्या दिसत आहे. असं असताना कोविड टास्क फोर्स अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या आणखी एका लाटेबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

कोरोनाची लाट आली तरी ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 या संभाव्य लाटेसाठी कारणीभूत ठरणार नसल्याचं टास्क फोर्स अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला तर कोरोना व्हायरसची पुढची लाट येत्या 6 ते 8 महिन्यांमध्ये येऊ शकते, असा इशारा देखील टास्क फोर्स अधिकाऱ्यांनी दिला आहे.

ओमिक्रॉनचा सब-व्हेरिएंट BA.2 हा BA.1 च्या तुलनेत अधिक संसर्गजन्य असला तरीही तो संभाव्य लाटेचं कारण ठरणार नाही. असं असलं तरी हा विषाणू आपल्या आसपासच असणार आहे. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्लाही टास्क फोर्स अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, देशात आता कोरोनाबाधितांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी अजूनही खबरदारी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

“संजय राऊतांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्र्वरही करणार नाही”

“गुलाबराव तुम्ही नाव लावूच नका, तुमच्या नावातील पहिलंच अक्षर खराब आहे”

आमरण उपोषण नक्की कशासाठी?; छत्रपती संभाजीराजेंनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या मागण्या

“राज्य दलाली खाण्यासाठी नसतं, मुंबई बाहेरही राज्य आहे, “

Corona: 12 वर्षांवरील मुलांसाठी आता ‘या’ लसीला मंजुरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More