बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दुकानं बंद करण्यास अजून एक तास वाढवून देण्यात यावा”

पुणे | कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यांचा आढावा घेऊन राज्य सरकारने अनेक नियम लागू केले आहेत. अशातच आता जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. या कारणामुळे व्यावसायिकांना 8 वाजता दुकान बंद कराव लागत आहे. याच पार्श्वभुमीवर आता पुण्यातील व्यापारी संघटनेने दुकान बंद करण्यासाठी 1 तास वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.

राज्य सरकारने लाॅकडाऊनचा इशारा दिला आहे. यावर दुकानदाराने लाॅकडाऊन नको असल्याची भुमिका घेतली आहे. फक्त दुकान बंद करण्यासाठी एक तासाची वेळ वाढवून मागितली आहे. व्यापारी प्रशासनाला सहकार्य करत असून त्यांनी देखील व्यावसायिकांना सहकार्य कराव अशी मागणी संघटनेचे सुर्यकांत पाठक यांनी केली आहे.

रात्री 8 वाजता पोलीस लाईट बंद करुन दुकानं बंद करण्यास सांगतात. याकारणामुळे भिती आणि संभ्रम वाढत आहे. लाॅकडाऊन नंतर आता कुठे व्यापार पूर्व पदावर आला असून दुकानाची आवरा आवर करण्यात 40 ते 50 मिनिटं ज्यादा लागतात, असं कारण दुकानदाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, दुकान बंद करण्याची वेळ 8 सोडून 9 वाजताची करावी. व्यापारी संघटनेमध्ये एकूण 40 हजार लोक आहेत. या सगळ्यांनी मिळून प्रशासनाला पत्र लिहून यासंदर्भात मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘बांगलादेश मुक्तीलढ्यात पंतप्रधानांना कोणत्या जेलमध्ये ठेवलं होतं?’; जयंत पाटलांचा मोदींना टोला

वाझेंना पुन्हा सेवेत घेतलं तेव्हाच सांगितलं होतं की…- संजय राऊत

सचिन वाझे कोणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे?-नारायण राणे

रितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

दिल्ली विमानतळावर अजय देवगणला मारहाण? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More