मुंबई | खासदार संजय राऊत यांच्यापाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक नेता सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.
हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणी PMC बँकेत झालेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी या नेत्याची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता असल्याचं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.
हा नेता शिवसेनेचा माजी खासदार असून अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या एका स्थानिक नेत्याचा नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे.
एचडीआयएल PMC बँकेत घोटाळा करुन मिळवलेल्या निधीचा मोठा हिस्सा या राजकीय नेत्याला मिळाला आहे. त्यामुळे ईडीकडून आता या शिवसेना नेत्याची झाडाझडती घेतली जाणार असल्याचं कळतंय.
थोडक्यात बातम्या-
कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल- रोहित पवार
पुढचे दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा!
‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; शिवसेनेची गुजराती मतदारांना साद
लसीकरणानंतर दुष्परिणाम झाल्यास उपचाराची तयारी ठेवा- उद्धव ठाकरे
जळगावातील खळबळजनक घटना; पैशाचं आमिष दाखवून 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार