महाराष्ट्र मुंबई

कोरोनामुळे मुंबई पोलीस दलातील आणखी एका हवालदाराचा मृत्यू

मुंबई | कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या आणखी एका 52 वर्षीय पोलीस हवालदाराचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधित पोलीस हे मुंबईतील पोलीस दलात कार्यरत होते. गेल्या दोन दिवसात दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका 52 वर्षीय पोलीस हवालदाराचा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

काल मुंबईत एका 57 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला. संबंधित पोलीस मुंबईतील एका पोलीस ठाण्यात कार्यरत होता.

दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत 96 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. 96 पोलिसांत 15 अधिकाऱ्यांचा आणि 81 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनचा खरंच मृत्यू झाला आहे का?

…तर ‘या’ महिलेकडे येऊ शकते उत्तर कोरियाची जबाबदारी; कोण आहे ही महिला?

महत्वाच्या बातम्या-

“गुणाकारात वाढणाऱ्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यात आपण यशस्वी ठरलो”

पुण्यातील या महत्त्वाच्या उड्डाणपुलाबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“सोडून दिलेली आग, कर्ज आणि आजार संधी मिळताच दुसऱ्यांदा वाढू शकतात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या