नवी दिल्ली | काही माणसं इतकी दिलदार असतात, की माणसं सोडाच ती मुक्या प्राण्यांवरही जीवापाड प्रेम करतात. असाच एक प्रकार अमेरिकेतील नॅशविले येथे समोर आला आहे. एका व्यक्तीनं स्वतःच्या मृत्यूआधी 5 मिलीयन डॉलर्स म्हणजेच 36 कोटी रुपयांची संपत्ती आपल्या कुत्र्याच्या नावावर केली आहे. ही घटना उजेडात येताच यासंदर्भात एकच चर्चा सुरु झाली आहे.
बिल डोरिस असं या जगातील सर्वात दिलदार माणसाचं नाव आहे. त्यानं एक कुत्र्याचं पिल्लू पाळून त्याचं नाव लुलू ठेवलं होतं. बिल डोरिस व्यावसायिक होता, त्याचा लुलूवर खूप लळा होता. मात्र मागच्या वर्षी बिलचा मृत्यू झाला.
बिलला लुलूची किती काळजी होती, हे बिलच्या मृत्यूनंतर समोर आलं. आपल्या मृत्यूनंतर लुलूला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी बिलने लुलूच्या नावावर तब्बल 5 मिलीयन डाॅलर्स म्हणजेच जवळपास 36 कोटींची संपत्ती त्याच्या नावावर केली.
बिलने लुलूला त्याची मैत्रीण मार्था बर्टनकडे सोपवलं आहे, मात्र लुलूच्या देखभालीचा खर्च नीट व्हावा यासाठी बिलने एक ट्रस्ट स्थापन करुन त्यात हे पैसे जमा केले असून ह्या ट्रस्टमधून लुलूच्या देखभालीचा मासिक खर्च देण्यात येतो. मात्र बिलच्या मृत्यूपत्रानुसार बर्टन आपल्या मर्जीने यातला पैसा वापरु शकत नाही.
दरम्यान, डोरिसची एकूण किती संपत्ती आहे हे अजूनही माहीत नसल्याचं बर्टनने सांगितलं आहे. बिलने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असून, त्याचं लुलूवर प्रचंड प्रेम असल्यामुळे मोठी संपत्ती लुलूच्या नावावर करण्यात आली. लुलू आता 8 वर्षांचा असून ही संपत्ती त्याच्या देखभालीसाठी खर्च होईल. आता लुलूला खूप प्रेम मिळेल तसंच तो खूश रहायची काळजी घेण्यात येईल, असंही बर्टनने म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
पी. बी. सावंत कोण होते?, जाणून घ्या संपूर्ण कारकीर्द
मराठी माध्यमातून शिक्षण, बीएमसीनं नोकरी नाकारली!; शिक्षक मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक
युवराज सिंगला मोठा धक्का, या प्रकरणात अखेर FIR दाखल
निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन
जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टेस्ला भारतात येताच सर्वात मोठी घोषणा