बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्रावर ॲसिड फेकताय, अरे कुठे फेडाल हे पाप”

मुंबई | शिवसेनेचा यावर्षीचा दसरा मेळावा हा षन्मुखानंद सभागृहात पार पडत आहेत. यावेळी मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर तसेच राज्यातील भाजप नेत्यांवर निशाण्यार घेत टीका केली आहे.

मुलगी शिकली प्रगती झाली पण तिच्या हाताला काम कुठंय. तिनं काही चुकीचं काम केलं तर सत्ताधारी म्हणून त्याला जबाबदार आहे. युवाशक्तीच्या घरात चूल पेटत नाही ते म्हणतील तुमचं राजकारण चुलीत पेटवा. आपण महाराष्ट्राला पुढं नेण्याचा प्रयत्न करतो आणि हे महाराष्ट्राला बदनाम करत आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे एकतर्फी प्रेमासारखं आहे मुलीनं नाही म्हटलं म्हणून ॲसिड फेकतो त्याप्रमाणे आहे. अरे माझ्या महाराष्ट्रावर कशाला ॲसिड फेकता कुठे फेडाल हे पाप? असा सवाल खडा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला आहे.

कोणीतरी सेलिब्रिटी धरायचा फोटो काढायचा हे असलं आम्ही करत नाही. कुणावर टीका करायची म्हणून मी बोलत नाही, पण आतातरी सुधरा. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली. आपला देश सर्वात तरुण पण त्यांच्याकडे काम नाही. त्यांना काम नसणं हा मोठा बॅाम्ब ठरु शकतो आणि लक्षात ठेवा तो तुमच्या बुडाखाली फुटेल, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला आहे.

थोडक्यात बातम्या –

“महाराष्ट्रात लोकशाही खून तर यूपीत काय लोकशाहीचा मळा फुलला आहे का?”

“जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे उमेदवार नाहीत, उपरे आणावे लागतात”

“शब्द जपून वापरतोय नाहीतर फाडायला काही वेळ लागत नाही”

“सावरकर-गांधी शब्द उच्चारण्याची तुमची लायकी नाही”

“गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर ड्रग्ज सापडलं त्यावर का बोलत नाहीत?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More