पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी तब्बल १ हजार झाडं कापली!

ओडिशा |  पंतप्रधान मोदींची बलांगीर जिल्ह्यात सभा होणार आहे. या सभेसाठी पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरने येणार आहेत. प्रशासनाने तात्पुरतं हेलिपॅड बनविण्यासाठी जवळपास एक हजार झाडांची कत्तल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

15 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओडिशा दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी खुर्द-बलांगीर रेल्वे लाईनला हिरवा झेंडा दाखवतील.

वन विभागाची परवानगी न घेता तात्पुरता हेलिपॅड उभारण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील अनेक झाडं कापण्यात आली आहेत, अशी माहिती बलांगीरच्या वन अधिकारी समीर सत्पथी यांनी दिली आहे.

दरम्यान, पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी झाडं कापणं गरजेचं होतं, असं रेल्वे विभागानं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आता व्हॉट्स अ‌ॅपवरही शेड्युल करता येणार मेसेज

-विरोधात जाणाऱ्यांना आडवं करण्याची ताकद आमच्या पक्षात आहे- रावसाहेब दानवे

-“सीबीआय आणि ईडी हे तर भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष”

-संजय काकडे-अशोक चव्हाण यांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण

-कन्हैय्या कुमारविरोधात देशद्रोहापकरणी आरोपपत्र दाखल