बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब! फक्त एका ट्विटमुळे उद्योगपती गौतम अदानी यांना एका दिवसात 1.03 लाख कोटींचा फटका

मुंबई | स्कॅम-1992 ही वेब सिरीज नुकतीच रिलीज झाली होती. एकेकाळी शेअर बाजाराचा बिग बुल राहिलेल्या हर्षद मेहता याच्या जीवनावर आधारित ही सिरीज होती. या सिरीजमधील सुचेता दलाल यांचं पात्र सर्वांनाच आवडलं होतं. याच प्रसिद्ध अर्थविषयक पत्रकार सुचेता दलाल यांनी केलेल्या एका ट्विटमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या त्या ट्विटनंतर अदानी ग्रुपचे शेअर्स बाजार उघडताच पडले. त्यामुळे उद्योगपती गौतम अदानी यांना एका दिवसात 1.03 लाख कोटींचा फटका बसला आहे.

पत्रकार सुचेता दलाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, काही ग्रुप शेअर बाजारातील शेअरच्या किंमती मॅन्युपुलेट करत आहे. परंतू, त्यांनी कोणत्याही कंपनीचं नाव घेतलं नाही. त्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेकडून नुकतीच तीन परदेशी गुंतवणूकदारांवर कारवाई केली गेली असल्याची माहिती समोर आली होती.

त्यानंतर अदानी ग्रुपच्या सर्वच्या सर्व कंपन्या खाली आल्या. सर्व 6 कंपन्यांचे शेअर्स पडले होते. त्यामुळे उद्योगपती गौतम अदानी यांना एका दिवसात 1.03 लाख कोटींचं नुकसान झालं. या सर्व प्रकारानंतर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेकडून कोणतंही डीमॅट अकाऊंट फ्रिज करण्यात आलं नसल्याचं सांगण्यात आलं. गेल्या वर्षभरात अदानी ग्रुप भारतातील तिसरा मोठा ग्रुप बनला आहे. त्यांंच्या पुढे टाटा ग्रुप आणि रिलायन्स ग्रुप आहेत.

दरम्यान, जगभरातील सकारात्मक वातावरण, रिलायन्ससह अन्य महत्वाच्या कंपन्यांना गुंतवणूकदारांची असलेली मोठी मागणी यामुळे सोमवारी प्रारंभी चलनवाढ झाल्यामुळे बाजारात झालेली घसरण मागे पडून शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उंची गाठली आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठा निर्णय! एसईबीसी प्रवर्गातील जागा आता खुल्या प्रवर्गातून भरणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार असलेला डेल्टा व्हेरीएंट आता डेल्टा प्लसमध्ये बदलला, भारताला धोका किती?

विजय वडेट्टीवार मुख्यमंत्र्यांवर नाराज? भर पत्रकार परिषदेत व्यक्त केली नाराजी

“जनता भाजपला कंटाळली असून आता काँग्रेस हाच भाजपला एकमेव पर्याय”

महाराष्ट्रातील कोणत्या महापालिका सध्या अनलॉकच्या कोणत्या स्तरामध्ये आहेत, जाणून घ्या एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More