Narendra Modi l लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान 20 मे ला पार पडणार आहे. या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक आणि दिंडोरीतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पिंपळगाव बसवंत येथे प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी मोदींची सभा चांगलीच गाजली आहे.
“मोदीजी आता कांद्यावर बोला” :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पिंपळगाव बसवंत येथे सभा घेतली. परंतु मोदींचे या सभेतील भाषणादरम्यान अचानक थांबले. मात्र त्यावेळी अनेकांना मोदी भाषण करता करता का थांबले याचे नेमकं कारण कळत नव्हतं. मात्र त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लोकांनी “मोदीजी आता कांद्यावर बोला” अशी घोषणाबाजी सुरु केली.
मात्र त्यावेळी पोलिसांनी वातावरण शांत करून मोदींनी पुन्हा एकदा भाषणाला सुरुवात केली. मोदींची ही सभा नाशिकचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे, दिंडोरी मतदारसंघाच्या भाजप उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीसह शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर घणाघाती टीका केली आहे.
Narendra Modi l मोदींनी जय श्रीराम अशा घोषणा देत प्रेक्षकांना प्रोत्साहित केले :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. मोदींनी भाषणाच्या दरम्यान नकली राष्ट्रवादी काँग्रेस आणि नकली शिवसेना असा उल्लेख करत ते काँग्रेसमध्ये विलीन होतील असे म्हटले आहे. त्यावेळी लोक मोदी-मोदी घोषणा देऊ लागले. पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरु असताना अचानक प्रेक्षकांमधून “मोदीजी आता कांद्यावर बोला” अशी घोषणाबाजी दिल्या आहेत.
यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम अशा घोषणा देत प्रेक्षकांना प्रोत्साहित केले. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर आपल्या योजनांची माहिती द्यायला लागले आणि कांदा उत्पादकांसाठी आपण काय काय केले हे देखील त्यांनी सांगितले आहे. परंतु मोदींनी शेतकऱ्यांनी दिल्या घोषणा ऐकताच आपलं भाषण लवकर उरकवलं आहे.
News Title – Onion Farmers During Prime Minister Narendra Modi Meeting In Pimpalgaon
महत्त्वाच्या बातम्या
या राशीच्या व्यक्तींना व्यवसायातून धनलाभ होईल
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सरकारचं दुर्लक्ष
“मुंबईत माणसं नाही तर जनावरं राहतात”; प्रसिद्ध अभिनेत्याचं वादग्रस्त विधान
“…तर सोनाली बेंद्रेला मी किडनॅपच केलं असतं”, शोएब अख्तरच्या वक्तव्यावर अभिनेत्रीची प्रतिक्रिया
देशभरात गाजलेल्या महादेव बेटिंग अॅपचे धागेदोरे थेट पुण्यापर्यंत; खळबळजनक माहिती समोर