सर्वसामान्यांना दणका! कांदा पुन्हा रडवणार, दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Onion Price Hikes | लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. केंद्रात आता एनडीए सरकार स्थापन झालंय. यानंतर सर्वसामान्यांना मोठ्या घोषणा होण्याची आशा लागली आहे. अशातच सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ लागणारी बातमी समोर आलीये. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली आहे.

दोन आठवड्यापूर्वी 15 ते 18 रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता 25 ते 30 रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याच्या भावात 5 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर किलोमागे 36 ते 40 रुपये किलो आहेत.

कांद्याचे दर वाढले

मिळालेल्या माहितीनुसार, कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. बाजारात सध्या टोमॅटो आणि इतर भाज्या देखील अधिक दराने विकल्या जात आहेत.

नवी मुंबईतील एपीएमसी (Onion Price Hikes) बाजारामध्ये प्रत्येक दिवशी 50 गाड्यांची आवाक होत असते. दररोज सरासरी 125 वाहने असताना आता केवळ 70 वाहने येत आहेत. इतकंच नाही तर, कांद्याच्या दरात झालेली वाढ म्हणजे देशाच्या उत्तर भागात कांद्याला वाढलेली मागणी आहे.

सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ

राज्यातील शेतकरी (Onion Price Hikes) चांगल्या प्रतीचा माल साठवून ठेवत असतात, जो जास्त काळ टिकतो आणि त्याचा पुरवठा पावसाळ्यात केला जातो. पण, यावेळी साठा देखील कमी झाला आहे. याचाच परिणाम सध्याच्या आवकेवर होत आहे.

येत्या काही दिवसांत कांद्याचे दर आणखी वाढू शकतात. कमी साठा येत असल्याने तो 50 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट नक्कीच कोलमोडले जातील. कांदा, बटाटे, लसूण, तांदूळ, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सध्या वाढताना दिसत आहेत.

News Title :  Onion Price Hikes

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक

मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक, उपोषण थांबवण्यासाठी शरद पवारांचं मोठं पाऊल

‘मिर्झापूर 3’ वेबसिरीज संदर्भात मोठी अपडेट समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीज

‘थोडं थांबा…’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना गंभीर इशारा

“लोकसभेत सर्वात जास्त मेहनत घेऊन उद्धव ठाकरेंना काय मिळालं?”